Good News: आदित्य नारायण-श्वेताच्या घरी नन्ही परीचं आगमन

aditya narayan and shweta agarwal
aditya narayan and shweta agarwal

पुढारी ऑनलाईन

गायक आणि होस्ट आदित्य नारायणच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्याची पत्नी श्वेता अग्रवालने एका नन्ही परीला जन्म दिला आहे. आदित्य-श्वेताच्या बाळाचा जन्म २४ फेब्रुवारीलाचं झाला आहे. पण, त्यांनी ही गुड न्यूज शेअर केली नव्हती. आदित्यने एका मुलाखत दिलीय. यामध्ये त्याने ही गुडन्यूज दिलीय.

या मुलाखतीत आदित्यने म्हटलंय- त्याला नेहमी वाटायचं की आपल्याला एक मुलगी हवी.

आदित्यने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली- यामध्ये त्याने सांगितलं की, लोक म्हणत होते की, मला मुलगा होणार. पण, मला नेहमी वाटायचं की, मला मुलगी व्हावी. मुली आपल्या वडिलांच्या खूप जवळ असतात आणि मी खूप खूश आहे की माझ्या घरी नन्ही परी आलीय. आई-वडील होऊन मी आणि श्वेता खूप खुश आहोत.

आदित्य म्हणाला, मी तिच्या प्रसुतीवेळी श्वेताजवळ होतो. तेव्हा मी पाहिलं की, महिला एका मुलाला या जगात आणण्यासाठी किती हिंमत, धाडस दाखवतात. श्वेतासाठी माझा आदर आणि प्रेम अनेक पटींनी वाढलं आहे. जेव्हा एक महिला मुलाला जन्म देते तेव्हा तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. प्रेग्नेंसीदरम्यन महिलांना अनेक गोष्टींचा सामना करायला लागतो.

आदित्यच बॅकग्राऊंड म्युझिक परिवारातील आहे. यामुळे त्याने आपल्या मुलीसाठी आतापासूनचं गाणे गायला सुरू केलं आहे. ही गोष्ट आदित्यने सांगितली. त्याने मुलाखतीत म्हटलं की, मी आतापासून त्याच्यासाठी गाणे गातो. म्युझिक तिच्या डीएनएमध्ये आहे. माझ्य़ा बहिणीने तिला एक छोटं म्युझिक प्लेयर गिफ्ट केलं आहे. या प्लेयरमध्ये नर्सरी राइम आणि आध्यात्मिक म्युझिक आहे. तिचा संगीताचा प्रवास आतापासून सुरू झाला आहे.

आदित्य-श्वेताने एकमेकांना ११ वर्षे डेट केलं. त्यानंतर दोघांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं. दोघांचं लग्न जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडलं होतं.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news