शेन वॉर्नला मिळाली होती बॉलिवूडची ऑफर, पण ‘या’ कारणामुळे… | पुढारी

शेन वॉर्नला मिळाली होती बॉलिवूडची ऑफर, पण 'या' कारणामुळे...

पुढारी ऑनलाईन

महान फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या झटकाने अकाली निधन झाले. (Australian cricketer Shane Warne)  वयाच्या ५२ व्या वर्षी त्याचं जाणं, सर्वांना धक्का देणार ठरलं आहे. क्रिकेट विश्वात तो उत्तम खेळाडू होता. त्याला बाॅलीवूडमध्‍ये  चित्रपटांची ऑफरदेखील मिळत होते. या गोष्टींचा खुलासा स्वत: शेन वॉर्नने केला होता. त्याने असे म्हटलं होतं की, त्याच्यावर एक बायोपिक तयार होत आहे.  त्य़ाची भूमिका हाॅलीवूड स्‍टार ब्रॅड पिट किंवा लियोनार्डोने साकारावी, अशी अपेक्षा त्‍याने व्‍यक्‍त केली हाेती.  ( Brad Pitt or Leonardo DiCaprio)

ही गोष्ट २०१५ ची आहे. जेव्हा शेनने सांगितलं होतं की, त्याला बॉलिवूडकडून ऑफर आली होती. एका मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, ब्रॅड पिट वा लियोनार्डोने त्याचा बायोपिक ‘हॉलिवूड आइस्ड’मध्ये भूमिका करावी. हा चित्रपट भारतीय प्रेक्षकवर्गासाठी तयार केला जात होता. भारतातही त्याची लोकप्रियता होती. त्याचे बॉलिवूड सेलेब्सशी मैत्री होती. त्यामुळे चित्रपटात येणं विचित्र वगैरे काही नव्हतं.

शेनने काही वर्षांनंतर सांगितलं होतं की, एक भारतीय प्रोडक्शन कंपनी त्याच्या बायोपिकसाठी त्याच्याशी संपर्कात साधला आहे; पण, कोराेना महामारीमुळे बायोपिकवरील काम थांबवण्यात आले होता. एका न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, शेनने म्हटलं होतं की, ‘मला वाटतं आणि अपेक्षादेखील आहे की, वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी याची आम्ही पुन्हा सुरुवात करु. पाहुया की काय होऊ शकतं.’

शेनचं म्हणणं होतं की, चित्रपटामध्ये ब्रॅड पिट किंवा लियोनार्डोने त्याची व्यक्तीरेखा साकारावी. शेनच्या माहितीनुसार, ‘एका तरुणाने स्क्रिप्टदेखील लिहिली होती. त्या कंपनीला हे शूट करायंचं होतं.’

बॉलीवूडचे अनेक दिग्गज शिल्पा शेट्टी, अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, शिबानी दांडेकर, वरुण धवन आणि अन्य सेलेब्सनी सोशल मीडियावर महान फिरकीपटू व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याच्‍या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

Back to top button