Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अतरंगी फोटोशूटने दाखविली कमाल

Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अतरंगी फोटोशूटने दाखविली कमाल

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) यांचा आगामी 'अटॅक १' (Attack 1) चित्रपटात १३ ऑगस्ट २०२१ रोजी चित्रपटगृहात दस्तक देत आहे. जॉन अब्राहम आणि जॅकलिनसोबत चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दिसणार आहेत. जॅकलिन फर्नांडिस नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते. सध्या तिने अंतरंगी फोटोशूट केले आहे.

नुकतेच जॅकलिन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक ॲन्ड व्हाईट रंगात काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत. फोटोशूट करताना जॅकलिनने कोट आणि पॅन्ट परिधान करत हटके पोझ दिली आहे. या फोटोतील खास म्हणजे, जॅकलिन आपल्या दोन्ही पायात वेगवेगळ्या रंगाचे हिल्स परिधान केल्याचे दिसत आहे. तिने एका पायात पांढऱ्या हिल्स तर दुसऱ्या पायात ब्लॅक रंगाचे बूड परिधान केले आहे. हा तिचा हटके आणि अंतरंगी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'The axe forgets but the tree remembers ?'. असे लिहिले आहे. याशिवाय जॅकलिनच्या इंन्स्टाग्रामवर तिच्या आगामी 'अटॅक १' (Attack 1) चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता जॉन अब्राहम एक बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जखमाही दिसत आहेत.हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजर्सने 'तुझा अंदानी सर्वाना घायाळ केलं', ' नेहमी आकाशात भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतेस' असे लिहिले आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी देखील शेअर केले आहेत. याआधी जॅकलीने निळ्या रंगाच्या वनपीस आणि ब्लॅक ॲन्ड व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं. या फोटोला साडेचार लाखांहून अधिक युजर्सनी कॉमेंन्टस केल्या आहेत.

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून 'अटॅक १' (Attack 1) चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यात त्याने 'अटॅक' चित्रपट १३ ऑगस्ट २०२१ रोजी रिलीज होणार असल्याचे म्हटलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्यराज आनंद यांनी केले आहे. यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news