मोठी बातमी! शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र

मोठी बातमी! शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : गेल्या महिन्यात शिवसेनेत उभी पडल्यानंतर पडल्यानंतर आता पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली.

शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या १२ खासदारांनी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा गट म्हणून ओळख मिळावी यासाठी अध्यक्षांना पत्र दिले आहे. खासदार भावना गवळी ह्या आमच्या गटाच्या मुख्य प्रतोद असतील. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बंडखोरीच्या वाटेवर असलेल्या १२ पैकी ८ खासदार उपस्थित राहिले होते. शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे.

१२ खासदार स्वतंत्र गट करण्याच्या प्रयत्नात असले तरी अद्याप उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अजूनही पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, संजय जाधव, अरविंद सावंत, राजन विचारे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि कलाबेन देऊळकर यांचा समावेश आहे.

तर शिंदे यांच्या सोबत १२ खासदार आहेत. धैर्यशील संभाजीराव माने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव गणपतराव जाधव, कृपाराव गवळी, कृपाराव जाधव, तुळशी पाटील अशी या खासदारांची नावे आहेत.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news