Serena Williams : सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा, यूएस ओपनमध्ये खेळणार शेवटचा सामना

Serena Williams
Serena Williams

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेनिसमध्ये अनेक वर्षे आपल्या खेळाने कोर्टवर अधिराज्य गाजवणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीची घेत असल्याचे जाहीर केले. यूएस ओपनमध्ये ती टेनिस कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळणार आहे. गेल्या वर्षभर कोर्टापासून लांब राहिल्यानंतर सेरेनाने यावर्षी जूनमध्ये पुनरागमन केले. सध्या सेरेना टोरंटो ओपनमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तिने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. (Serena Williams)

दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने निवृत्ती जाहीर करताना सांगितले की, मी टेनिसमधून निवृत्ती घेत आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या यूएस ओपनमध्ये खेळून टेनिस कारकीर्द थांबवण्याची योजना आखली आहे. वर्षभर कोर्टवर अनुपस्थित राहिल्यानंतर, ती जूनमध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये एकेरी स्पर्धेत परतली. (Serena Williams)

एक वर्षापासून कोर्टपासून दूर असलेल्या 40 वर्षीय सेरेनाने पुनरागमन केल्यानंतर सोमवारी आपला दुसरा एकेरीचा सामना खेळला. तो सामना टोरंटो ओपनमधील होता. सेरेनाने स्पेनच्या नुरिया पारिजास डायसचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. 40 वर्षीय सेरेनाने त्या सामन्यानंतर तिने सांगितले की, ती तिच्या टेनिस कारकिर्दीच्या अंतिम वळणावर उभी आहे.

सेरेना विल्यम्स कारकिर्दीच्या अंतिम वळणावर

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना म्हणाली, मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. हे मला ट्रेंडी शब्द वाटत नाही. मी हे एक संक्रमण म्हणून पाहतो, परंतु तो शब्द कसा वापरायचा याबद्दल मला संवेदनशील व्हायचे आहे. मी काय करणार आहे याचे वर्णन करण्यासाठी कदाचित सर्वोत्तम शब्द म्हणजे 'उत्क्रांती'.

सेरेनाने पुढील वाटचालीबद्दल सांगितले की, पुढे काय करणार आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे "उत्क्रांती" हाच आहे. तसेच तिला आता कुटुंब वाढवायचे आहे. पुढे ती म्हणते "मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी निवृत्तीकडे संक्रमण म्हणून पाहते.

सेरेना विल्यम्सने नंतर एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले, 'जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते, तेव्हा गोष्टी नेहमीच कठीण असतात. मी टेनिसचा आनंद घेत आहे, पण आता टेनिस कोर्टचा निरोप घ्यायचा आहे. पुढील काही आठवडे मी त्याचा आनंद घेणार आहे

23 ग्रँडस्लॅम जेतेपदे

सेरेना विल्यम्सने 2017 मध्ये शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. सेरेनाने आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकली असून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ती एक ग्रँडस्लॅम दूर आहे. 2017 मध्ये मुलगी ऑलिम्पियाला जन्म दिल्यानंतर चार वेळा फायनलमध्ये पोहोचूनही तिला अंतिम सामना जिेकता आला नव्हता त्यामुळे तिला मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news