कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | पुढारी

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा जोर सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली.

मार्च एप्रिल, 2022 मधील सर्व जभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रावर सुरू आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्हयामध्ये उदभवलेल्या पूर परिस्थीतीमुळे विद्यायांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही भागामध्ये विजेचा पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. तसेच इंटरनेट कनेक्शनचा अडथळा देखील उद्भवू शकतो. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी दि. 10 व 11 ऑगस्ट, 2022 रोजी होणा-या सर्व अभ्यासकमाच्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. तसेच स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे नविन वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

हेही वाचा :

Back to top button