पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'राज्याच्या सर्वच भागांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आता कमी होणार आहे. केवळ काही भागांतच बुधवारी पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे,' असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. केवळ पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा). सातारा (घाटमाथा), भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागांतच बुधवारी (दि.10) मुसळधार पावसाची शक्यता आहे. 'राज्याच्या सर्वच भागांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आता कमी होणार आहे. केवळ काही भागांतच बुधवारी पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे,' असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर सोमवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होऊन ते आंध—प्रदेशाच्या किनारपट्टीपासून छत्तीसगडपर्यंत सरकले होते. मात्र, या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे; तर गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. या स्थितीमुळेच राज्यातील पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. केवळ पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा). सातारा (घाटमाथा), भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागांतच बुधवारी (दि.10) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मध्यम पाऊस पडेल तसेच उर्वरित भाग कोरडा राहणार आहे. गुरुवारपासून तर राज्यात पाऊस पूर्णपणे उघडीप देण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
याबाबत माहिती देताना पुणे वेधशाळेचे माजी हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, "15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असला, तरी गुरुवारपासून (दि.11) कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अतिजोर काहीसा कमी होऊन मध्यम ते मुसळधार पावसाचीच शक्यता जाणवेल. ओरिसा किनारपट्टीवरील कमी दाबक्षेत्र सध्या भुवनेश्वरच्या जवळ पोहोचून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले व ते छत्तीसगडकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते.'
'मान्सूनचा पूर्वोपश्चिम आस समुद्रसपाटीला त्याच्या नेहमीच्या सरासरी जागेपेक्षा तो अतिदक्षिणेला अनुकूलतेकडे सरकला असून, तो नलिया अहमदाबाद इंदोर, रायघर, भुवनेश्वर या शहरांना छेदून बंगालच्या उपसागरात उतरला आहे. अरबी समुद्रात समुद्रसपाटीला गुजरात ते केरळदरम्यान पश्चिम किनारपट्टी समांतर हवेचा तटीय कमी दाब पट्ट्याची उपस्थितीमुळे पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुढेही दीर्घकाल पाऊस कोसळण्याच्या व नंतरही नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर धरणप्रवण क्षेत्रात पाण्याची जबरदस्त आवक चालूच राहणार आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्याच्या काही भागांत पडलेला पाऊस (मी.मी.)
कोकण : लांजा- 334, तळा- 210, मंडणगाड-170, माणगाव-163, संगमेश्वर- देवरूख-144, पेण-143, चिपळूण-140, रोहा -135, रत्नागिरी-133, दापोली-128, सुधागड-127, पोलादपूर-120, कणकवली- 124 ,सांताक्रुझ-124, खालापूर-112, कल्याण-73
मध्य महाराष्ट्र : राधानगरी-197, महाबळेश्वर-192, शाहूवाडी-145, लोणावळा-136, चांदगड-115, कोल्हापूर-56, माळेगाव-34
मराठवाडा : चिकलठाणा- 446, वैजापूर-33, माहूर-30, लोहारा- 29, जाफराबाद-23, सिल्लोड-24,
विदर्भ : ब्रम्हपुरी-223, भंडारा-140, सडक अर्जुनी-103, वाशिम -100, नरखेडा-97, आरमोरी-93, भिवापूर-89,चिखलदरा-60, गडचिरोली-73,
घाटमाथा : डोंगरवाडी-274, दावडी-268, भिरा-251, शिरगाव- 214, ताम्हिणी-200, अंबोणे- 159, कोयना (पोफळी)- 159, लोणावळा (टाटा)-119, कोयना (नवजा)-115, खोपोली- 95.