कोण आहे सलमानची भाची Alizeh Khan, तिला बॉलिवूडमध्ये करतोय लॉन्च

सलमान खान भाचीला चित्रपटात आणणार
सलमान खान भाचीला चित्रपटात आणणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) नुकताच रिलीज झालेला त्याचा चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष खान मुख्य भूमिकेत आहे. सलमानने त्याला बॉलिवूडमध्ये 'लवयात्री' चित्रपटातून लॉन्च केलं होतं. आतापर्यंत अनेक सुंदर अदाकारांना सलमानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केलंय. सोनाक्षी सिन्हा, कॅटरीना कैफ, सई मांजरेकर यासारख्या अभिनेत्रींचा तो गॉडफादर आहे. आता तो अलिजेह अग्निहोत्री (Alizeh Khan) ला लॉन्च करणार आहे. Alizeh Khan ही सलमान खानची भाची आहे.

अलिजेह रोमान्स ड्रामा चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होईल, हा चित्रपट सलमान खान, अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री आणि निखिल नमित प्रोड्यूस करतील.

असं म्हटलं जात आहे की, सलमान खान अलिजेहला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे. हा ग्रँड लॉन्च म्हटलं जात आहे.

अलिजेहचे सिनेबॅकग्राऊँड असली तरी, ती या क्षेत्रातील नाही. त्यामुळे मॉडलिंग आणि जवळपास २ वर्षांपासून ती अभिनय-ड्रामा शिकत आहे.

सलमान आणि त्याच्या आई-वडिलांना असं वाटतं की अलिजेह आता आपल्या अभिनयाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. सलमान खानने आतापर्यंत अलिजेहच्या अभिनयाची पूर्ण अपडेट घेतली आहे. रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे- ते सध्या दिग्दर्शक आणि अन्य कास्ट फायनल करत आहेत.

सलमान खान लवकरचं भाचीला लॉन्च करण्याची घोषणा करणार आहे. अलिजेहच्या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग २०२२ मध्ये सुरू होईल. २०२३ मध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

असंही म्हटलं जात होतं की, याआधी अलिजेह सूरज बडजात्याच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. हा चित्रपट अवनीश दिग्दर्शित करणार होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सलमानला चित्रपटासाठी एक परफेक्ट कन्सेप्ट मिळाला. तो एक रोमान्स ड्रामा असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news