Salman Khan : सलमान खानच्या अडचणीत पुन्हा वाढ, कोर्टाने बजावले समन्स

Salman Khan : सलमान खानच्या अडचणीत पुन्हा वाढ, कोर्टाने बजावले समन्स

मुंबई; पुढारी ऑनलाईन; बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला ( Salman Khan ) नुकतेच काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयाने दिलासा दिला होता. परंतु, सलमानच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे.

सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याने तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराशी मुंबईच्या रस्त्यावर गैरवर्तन केले होते. सलमान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी त्याचा एक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट सलमानला अजिबात आवडली नाही. यामुळे सलमान आणि बॉडीगार्डने अशोक पांडे यांचा मोबाईल हिसकावून घेत त्याला धमकी दिली होती. या प्रकरणी पत्रकाराने सलमानविरोधात तक्रार दाखल झाली होती.

यानंतर सलमान ( Salman Khan ) आणि बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख याच्यावर मुंबईतील अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत समन्स बजावले आहे. यात न्यायालयाने दोघांना ५ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अंधेरी न्यायालयात यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सायकल चालवत असताना पत्रकार अशोक पांडे यांनी त्याच्या १५ ते २० मिनिटे पाठलाग करत व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते. ही गोष्ट सलमानला खटकल्याने 'व्हिडिओ काढू नका, डिलीट करा' असे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबईच्या रस्त्यावर सलमान, त्याचा बॉडिगार्ड आणि अशोक पांडे यांचा वाद झाला. या दरम्यान सलमानने पत्रकारांकडून मोबाईल हिसकावून घेत धमकी दिली होती. यानंतर पत्रकार अशोक पांडे यांनी तक्रार दाखल केली होती.

गेल्या काही दिवसापुर्वीच सलमानला काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान न्यायालयाने दिलासा दिला होता. तर पुन्हा पत्रकारांशी गैर वर्तना केल्याचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला आहे. यानतर तो अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर राहणार की, नाही, हे पाहणे औक्युक्याचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news