पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या मुलाने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रथमेश गजानन मारणे (वय २२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला खडकवासला येथे फिरण्यास नेले होते. फिरून घरी परत येत असताना त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले.

तेथे एका रूममध्ये तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तसेच, प्रथमेशने तिथे तिच्या संमतीशिवाय, नकळतपणे, चोरून, परस्पर अश्लील व्हिडिओ बनवले. सदर व्हिडीओ डिलीट करण्याची फिर्यादीने विनंती केली असता आरोपीने टाळाटाळ केली. फिर्यादीने त्याला तुझ्या या कृत्याबाबत पोलिसांत तक्रार देईल, असे बोलले असता तुला काय करायचे ते कर व ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news