पिस्तूल दाखवून पळवला पावणेपाच लाखांचा ऐवज

Pimpri: One arrested for carrying pistol
Pimpri: One arrested for carrying pistol
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी दुकानातून फॉर्मिंगचे दागिने, कामगारांचे मोबाईल, रोकड, असा चार लाख 69 हजार 700 रुपयांचा ऐवज पळवून नेला. रविवारी (दि. 20) सकाळी पावणेनऊच्या सुमारास काळेवाडी येथे ही घटना घडली.

मनसुखलाल घिसुलालजी राठोड (55, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तीन ते चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे मुख्य रस्त्यावर फिर्यादी यांचे आर. के. गोल्ड नावाचे फॉर्मिंगचे दागिने रिटेल व होलसेलचे दुकान आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चोरटे फिर्यादी यांच्या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी देत हाताने मारहाण केली.

चोरट्यांनी दुकानातून फॉर्मिंगचे दागिने व फिर्यादी व कामगारांचे मोबाईल तसेच फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, खिशातील व प्लास्टिकच्या बॉक्समधून रोख रक्कम, असा चार लाख 69 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेतला.

त्यानंतर फिर्यादी यांचे चारचाकी वाहन पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.

https://youtu.be/54feKZ9Pdlc

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news