पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan death threat ) याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुकआउट परिपत्रक (LOC) जारी केले आहे. काही दिवसांपूर्वी ई मेल द्वारे सलमान खानला धमकी देण्यात आली होती. माफिया ग्रोल्डी ब्रारच्या नावे ही धमकी देण्यात आली होती. सलमानला यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारे धमकी देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने माफिया किंगपिन गोल्डी ब्रारच्या नावाने ई-मेल पाठवून बॉलिवूडच्या दबंग स्टारला जीवे मारण्याची धमकी दिली होती. राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह (IGI विमानतळ, नवी दिल्ली) देशातील सर्व प्रमुख विमानतळांना या लूक आऊट सर्कुलर नोटिसची माहिती देण्यात आली आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीचीही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रानुसार, या घटनेनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सलमान खानशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले होते. खरं तर, 10 एप्रिल रोजी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (किसी का भाई, किसी की जान) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्याच रात्री एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सलमान खानच्या नावाने धमकी दिली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नात फोन करणाऱ्याने स्वत: राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. त्यांनी स्वतःची ओळख गोरक्षक रॉकी भाई अशी करून दिली होती. ३० एप्रिलपर्यंत सलमान खानला संपवून टाकेन, अशी धमकी आरोपी रॉकी भाईने दिली होती.
सलमान खानने कबुल केले आहे की, आजूबाजूला "अनेक बंदुका" पाहून तो घाबरतो. माध्यमांशी पुढे बोलताना तो म्हणाला की, "मी सर्वत्र पूर्ण सुरक्षिततेने जात आहे. मला माहित आहे की जे काही घडणार आहे ते तुम्ही काहीही केले तरी ते घडेल. आता माझ्या आजूबाजूला इतक्या बंदुका माझ्याभोवती फिरत आहेत की आजकाल मी स्वतः घाबरलेलो आहे. दरम्यान, सलमान 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरचं येत्या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. सध्या त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट चर्चेत आहे.
हेही वाचा