सलमान खान धमक्यांना घाबरत नाही, म्‍हणाला, जे व्हायचे ते होईल... | पुढारी

सलमान खान धमक्यांना घाबरत नाही, म्‍हणाला, जे व्हायचे ते होईल...

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा नविन चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. दरम्यान, त्याला मेलद्वारे धमक्या आल्या होत्‍या. यानंतर मात्र त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सुपरस्टार सलमानला सध्या कडक सुरक्षा देण्यात आली आहे. एका मुलाखतीत धमकी देण्यात आली होती. त्‍यानंतर सलमानला ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या धमकीमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार असल्याचे सांगितले जात आहे. सलमानला गेल्‍या अनेक दिवसात सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांची काळजी वाढली आहे.

सुरक्षा वाढविण्याच्या नकार ; सलमान खान

एका मित्राचे सांगितले की, सलमान सतत येण्याा-या धमक्‍यानंतरही त्याची सुरक्षा वाढविण्याच्या विरोधात होता. तसेच सलमान म्‍हणाला, त्‍याला वाटते की तो जितके याकडे लक्ष देईल, तितकेच त्यांना वाटेल की ते यामध्ये गोष्टीत यशस्वी होत आहे… तर सलमान नशिबावर खूप विश्वास ठेवतो… जे जेव्हा व्हायचे असते तेव्हा होईल.” असे सलमान खान म्‍हणाला.

घरच्यांच्या विनंतीवरून सलमान खानने बाहेर जाण्याचे प्रमाण कमी केले आहे. तसेच तो किसी की भाई किसी की जान या नव्या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनसाठी त्याला बाहेर जावे लागणार आहे.

.हेही वाचा 

Salman Khan Threat Mail : सलमान खानला पुन्हा धमकी; मुंबई पोलिसांनी घराबाहेर सुरक्षा वाढवली 

Salman Khan : ‘सलमान खानने माफी मागावी अन्यथा त्याच्याच भाषेत धडा शिकवूया’ – गँगस्टर बिष्णोई

Salman Khan : अल्पवयीन मुलाकडे होती सलमान खानला ठार मारण्याची जबाबदारी

Back to top button