पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी २०२२ सालचा आयफा पुरस्कार खूपच अविसंस्मरणीय ठरला. IIFA २०२२ पुरस्कार सोहळ्यात सलमानने आपल्या जीवनात वर्षानुवर्षे ज्यांनी पाठिंबा दिला त्यांची आठवण सांगून त्यांचे आभार मानले.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी अर्थात आयफा (IIFA २०२२) पुरस्कार सोहळा अबूधाबी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड दिग्गज स्टार सलमान खानने दिमाखात एन्ट्री केली. याच वेळी सलमान थोडा भावूक होत त्याने वर्षानुवर्षे पाठिंबा दिलेल्या कलाकारांचा उल्लेख केला. यात खास करून, सलमानने अर्जून कपूरचे वडील आणि निर्माता बोनी कपूरचे यांच्या नावाचा उल्लेख करून त्याचे मनपुर्वक आभार मानले आहेत.
यात निर्माता बोनी कपूर यांनी 'वॉन्टेड' नावाच्या चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. वॉन्टेडनंतर सलमानने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले. परंतु, एक वेळ अशी आली की, मला कोणाच्या तरी मदतीची गरज होती. यावेळी बोनी कपूर धावून आले. त्यांनी मला मदत केली. वॉन्टेड चित्रपटातून मी बॉक्स ऑफिसवर कमबॅक केले. यानंतर त्यांनी मला 'नो एंट्री' चित्रपटासाठी साईन केलं. यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. असे सलमानने म्हटले आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान नेहमीच निर्माता बोनी कपूर यांच्या कुटुंबाच्या जवळ आहे. सलमान खान आणि अनिल कपूर यांची मैत्री ९० च्या दशकापासून आहे. बोनी कपूरच्या मैत्रीसाठीच सलमानने अर्जुन कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास मदत केली होती. सलमानने स्वतः अर्जुन कपूरला जिमचे प्रशिक्षण दिल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचलंत का?