कीव; पुढारी ऑनलाईन
Russia-Ukraine war news Live updates : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मोठी जीवितहानी झाली आहे. गुरुवारी १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३१६ जण जखमी झाले आहेत. रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला केला असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
१३७ मृतांमध्ये युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांचा समावेश आहे. युक्रेनचे तीन तुकडे करून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती केल्यानंतर रशियाने युक्रेनच्या (Russia-Ukraine war) भूमीवर प्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. जगातील बडी राष्ट्रे या संघर्षात पडून जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल की काय, अशी धाकधूक निर्माण झाली आहे.
Russia-Ukraine war news Live updates :
Russia attacks Ukraine : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १३७ युक्रेनियनचा मृत्यू झाला आहे. यात सैनिक आणि नागरिकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ३१६ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित केले. रशियाने कीववर शुक्रवारी पहाटे ४ वाजता क्षेपणास्त्रे हल्ले केले. रशियाकडून युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. मीदेखील रशियाच्या रडारवर आहे. पण मी घाबरून कीव शहर सोडून जाणार नाही, असे प्रत्युत्तर झेलेन्स्की यांनी दिले आहे.
रशियन लष्करी हल्ल्याच्या भीतीने युक्रेनच्या नागरिकांनी भूमिगत मेट्रो स्टेशनवर आश्रय घेतला आहे…
रशियाकडून कीव शहरावर रात्रभर हल्ला, युक्रेनचे म्हणणे
भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके युक्रेनकडे रवाना झाली आहेत.
रशियाचे आणखी एक विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा
युक्रेनची राजधानी कीवमध्ये मोठे स्फोट, सुत्रांची माहिती
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठी जीवितहानी, १३७ ठार
हे ही वाचा :