अल्लू अर्जुननंतर रश्मिका मंदाना हिचा वरुण धवनसोबत फोटो व्हायरल

rashmika madanna and varun dawan
rashmika madanna and varun dawan

पुढारी ऑनलाईन डेस्क

ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीय. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही खळबळ उडवून दिली. हिंदी भाषेतील चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले. दरम्यान, रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती मिळत आहे.

रश्मिकाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी आणि एकत्र मजा करताना दिसत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर त्यांनी हा फोटो नमका कशासाठी शेअर केलाय, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. हा चित्रपट आहे की जाहिरात? असा प्रश्न त्यांना पडलाय. हा फोटो शेअर करत अभिनेत्री रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, Cutest together… यासोबतच तिने हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे.

rashmika madanna
rashmika madanna

रश्मिका मंदान्नाच्या या पोस्टनंतर चाहते अनेक कमेंट करत आहेत. त्यांच्या फोटोलाही चाहते लाईक करत आहेत. त्याचवेळी, रश्मिका आता वरुण धवनसोबत बॉलिवूडमध्ये दिसणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्याबद्दल तिचे चाहते तिला सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत. साऊथच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने 'पुष्पा' चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारलीय. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय.

रश्मिकाला नॅशनल क्रश असेही म्हटले जाते. ती अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. एवढेच नाही तर ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पुष्पाचा या चित्रपटाचा पहिला भाग चाहत्यांना खूप आवडला. आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाचीदेखील चाहते प्रतीक्षा करत आहेत.

rashmika madanna
rashmika madanna

अभिनेत्री रश्मिका ही शंतनू बागची दिग्दर्शित मिशन मजनू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, जो पाकिस्तानमधील भारताच्या रॉ मिशनवर आधारित आहे. अमर बुटाला, रॉनी स्क्रूवाला आणि गरिमा मेहता निर्मित या चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपी मुव्हीजच्या बॅनरखाली केली गेली आहे.

याशिवाय ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुड बाय या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा एका बाप-लेकीवर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. रश्मिकाचे दोन्ही हिंदी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news