नाशिक : चांदवड तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

नाशिक : चांदवड तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक ( चांदवड ) पुढारी वृत्तसेवा ; नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात बुधवार (दि.९) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या पावसात तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कैलास सूर्यभान कवडे (३६) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकरी कवडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मयत शेतकऱ्याचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.

 

Back to top button