सांगली : एकाच ठिकाणी तीन फ्लॅट फोडले | पुढारी

सांगली : एकाच ठिकाणी तीन फ्लॅट फोडले

सांगली : पुढारी वृत्तसेवा
येथील वसंतनगर परिसरात एकाच ठिकाणी तीन फ्लॅट फोडले. त्यातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वसंतनगर येथे संकेत अपार्टमेंट या ठिकाणी सोमवारी दुपारी बंद असलेले सुहास दगडू चव्हाण (रा. मूळगाव आरवडे, ता. तासगाव) यांचा फ्लॅट फोडला. आतील 72 हजार 600 रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. याच अपार्टमेंटध्ये बंद असलेला संकेत संतोष कुमणे यांचा फ्लॅट फोडला. मात्र, चोरट्यांना त्याठिकाणी काही मिळाले नाही.
संकेत अपार्टमेंटच्या शेजारी शिवानी प्लाझा अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी दीपा संतोष वाघमारे यांच्याही फ्लॅटचा बंद दरवाजा तोडून त्याठिकाणीही काही रोख रक्कम व दागिने लंपास करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा व कपाटाचे ठसे घेतले. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button