पुढारी ऑनलाईन डेस्क: कोईमतूर येथील एअर फोर्स ट्रेनिग कॉलेजमधील महिला हवाई दल अधिकाऱ्यावर तिच्याच सहकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच तेथील मेडिकल सेंटरमध्ये तिची कौमार्य चाचणी केल्याची घटनाही घडली आहे.
बलात्कारानंतर संबधित महिला अधिकाऱ्याला तिच्या वरिष्ठांनी धमकावले तसेच तिला ब्लॅकमेलही केल्याचे संबधित अधिकाऱ्याने ऑनलाईन एफआरआयमध्ये नोंदवले आहे.
२६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणासाठी रेडफील्डमधील एअर फोर्स कॉलेजमधील महिला आयएएफ अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुख यांना अटक केली आहे.
कोइमतूर येथील एअरफोर्स कॉलेजमध्ये देशभरातील हवाई दल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
ऑगस्ट २०२१ मध्ये या कॉलेजमध्ये ३० अधिकाऱ्यांची एक टीम प्रशिक्षणासाठी आली होती.
त्यात २९ वर्षीय महिला अधिकाऱ्याचा समावेश होता. १० सप्टेंबर रोजी संबधित महिला अधिकारी खेळत असताना पडल्याने जज्ञी झाली होती.
तिच्या पायाला जखम झाल्याने चालताना त्रास होत होता. तिने वेदनाशामक औषधे घेतली होती.
त्यानंतर तिने मित्रांसोबत मद्यपानही केले. मद्यपान केल्यानंतर तिला मळमळूल लागले आणि कालांतराने तिला उलट्या होऊ लागल्या.
तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या खोलीत नेऊन झोपवले. झोपी जाण्याआधीच संशयित अधिकारी हरमुख याने प्रवेश केला.
त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेला जाग आल्यानंतर तिने आरोपला खोलीतून जाण्यास सांगितले मात्र, त्याने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशीही हरमुख हा पीडितेच्या खोलीत उपस्थित होता.
त्यावेळी त्याने अत्याचार केल्याची कबुली दिली. त्याने आपण कुठल्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत माफीही मागितली.
या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात हरमुख हा अत्याचाराची कबुली देत असल्याचे पीडितेने सांगितले.
या प्रकाराची तक्रार संबधित महिला अधिकाऱ्याने ( हवाई दल अधिकाऱ्यावर बलात्कार ) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता तिने तक्रार मागे घ्यावी यासाठी दबाव आणला. जेव्हा तक्रार दाखल करण्यावर संबधित अधिकारी ठाम राहिली तेव्हा तिच्याकडे प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले. त्यानंतर या महिलेची कौमार्य चाचणी घेतली. या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मात्र, त्यांनीही तिला सहकार्य केले नाही.
पीडितेवर सतत दबाव आणि ब्लॅकमेल करण्यात आले. तिला कुणीच सहकार्य न केल्याने अखेर तिने ऑनलाईन तक्रार दाखल केली.
हेही वाचा :