Raju Srivastava life Story : कधी काळी ५० रु. घ्यायचा हा कॉमेडियन, सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

Raju Srivastava
Raju Srivastava
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. विनोदाच्या जगताचा विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava life Story) आपलं नाव कमावण्यासाठी १९८८ मध्ये मुंबईत पोहोचला होता. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राजू द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये तो उपविजेता झाला होता. या शोमध्ये त्याने गजोधर भैयाची भूमिका साकारली होती. या शोतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. (Raju Srivastava life Story)

राजूचा जन्म कानपूरमध्ये एका कवीच्या घरी २५ डिसेंबर, १९६३ रोजी झाला. सुरुवातीला त्याचे नाव सत्य प्रकाश असे ठेवण्यात आले होते. पण, जगात तो राजू श्रीवास्तवच्या नावाने प्रसिद्ध झाला. राजू श्रीवास्तवला सुरुवातीपासूनच लोकांना हसवण्याचा छंद होता. यामध्ये राजूने १९८८ मध्ये करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली. पण, त्यावेळीही एवढ्या मोठ्या महानगरात आपला ठसा उमटवणे सोपे नव्हते.

एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजूने सांगितले होते की, जेव्हा तो मुंबईत पोहोचला तेव्हा लोक कॉमेडियनला मोठा कलाकार मानत नव्हते. त्यावेळी कॉमेडी जॉनी वॉकरपासून सुरू होऊन जॉनी लिव्हरने संपत असे. काम न मिळाल्याने त्याच्याकडे पैशांचीही कमतरता होती. खर्च भागवण्यासाठी त्यानी ऑटो चालवला. राजूच्या म्हणण्यानुसार, तो ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना जोक्स ऐकून हसवायचा. त्याऐवजी त्यांना भाड्यासह टीप मिळायची. एका प्रवासीच्या संदर्भाने राजूला मोठा ब्रेक मिळाला होता.

मग एके दिवशी त्याला स्टँड-अप कॉमेडीसाठी ब्रेक मिळाला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्याला शो मिळू लागले. त्यावेळी मानधन म्हणून ५० रुपये मिळत होते. राजू श्रीवास्तवच्या म्हणण्यानुसार, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन ५० रुपयांतही तो कॉमेडी करत असे. लाफ्टर चॅलेंजने त्याला ओळखले नसते तर आज कथा वेगळी असती. राजू श्रीवास्तव द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये उपविजेता ठरला होता. या शोमध्ये त्याने उत्तर प्रदेशचा रंग दाखवला. प्रेक्षकांना आपल्या पंच लाईनने हसवून खुर्चीवर खिळवून ठेवले. या शोमध्ये 'गजोधर भैय्या' रनर अप होता. प्रेक्षकांनी त्याला 'द किंग ऑफ कॉमेडी' चे टायटल दिले. या शोमध्ये त्याने गजोधर भैय्याची भूमिका साकारली होती. त्यांचे हे नाव प्रत्येक घराघरात ओळखले जात होते.

हळू हळू त्याने कॉमेडी जगतात आपली ओळख निर्माण केली. राजूने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. परंतु, तो या जगात नाही. प्रेक्षकांचे त्याने भरपूर मनोरंजन केलं. याशिवाय राजूने राजकारणातही एन्ट्री केली होती. त्याने समाजवादी पक्ष सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पण त्याची कॉमेडी नंतरही टिकून राहिली. राजकारणात तो यशस्वी ठरला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news