पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतेच फोर्ब्सने जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या २५ महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू १२ व्या स्थानी आहे. (PV Sindhu Forbes List) या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २०१६ साली ब्राझीलमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि २०२० साली झालेल्या टोकियो स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूने २०२२ साली ७.१ दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. त्यापैकी ७ दशलक्ष डॉलरची कमाई ही तिने बक्षीसांव्यतिरिक्त इतर माध्यमांतून मिळवले आहेत.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने एकेरी स्ंपर्धेत सुवर्ण; तर दुहेरीमध्ये रौप्यपदक जिंकले होते. जपानची आघाडीची टेनिसपटू नाओमीओसाकाने तीन वर्षे फोर्ब्सच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तिने २०२२ मध्ये ५१.१ दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. (PV Sindhu Forbes List)
हेही वाचा;