

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनोरंजन क्षेत्रातून दिवसेंदिवस धक्कादायक घटनाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. अशी एक सर्वांना हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अवघ्या २० वर्षांच्या अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर आपले जीवन संपवले. या घटनेमुळे तिच्या सहकाऱ्यांना व मनोरंजन क्षेत्राला मोठा मानसिक धक्का बसला आहे. (Actress Tunisha Sharma Suicide)
मालिकेतीकेच्या सेटवरच जीवन संपवणाऱ्या अभिनेत्रीचे नाव तुनिशा शर्मा असे आहे. 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवरील मेकरुपमध्ये तिने स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. तिच्या सहकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले; पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तुनिशाने टोकाचे पाउल का उचलले याचे गूढ कायम आहे. (Actress Tunisha Sharma Suicide)
तुनिशा शर्माने वीरपुत्र – महाराणा प्रताप, चक्रवर्ती अशोक सम्राट, इंटरनेट वाला लव्ह या मालिकांमध्ये भूमिका केली होती. तिने जीवन संपविण्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामध्ये तिने लिहिलं होते की, 'एखाद्या गोष्टीने प्रेरित असतात ते कधी थांबत नाहीत'. यासोबत तिने स्वतःचा एक फोटोही शेअर केला होता. ज्यामध्ये ती स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. तिने केलेल्या या पोस्टची खूप चर्चा होत आहे. ज्यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
अधिक वाचा :