Narendra Modi : पुणेकरांनी मोदींना दिल्या अनोख्या शुभेच्छा! धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट 

Narendra Modi : पुणेकरांनी मोदींना दिल्या अनोख्या शुभेच्छा! धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या ७२ वा वाढदिवस आहे. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातुन अनेक ठिकाणी विविध पद्धतीने तसेच फलक लावून, रांगोळीच्या माध्यमातून पोट्रेट काढून त्याप्रमाणेचवेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र पुण्यात एका भाजपच्या कार्यकर्त्याने नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी बँकेचे संचालक किशोर उर्फ राजेंद्र तरवडे यांच्या वतीने मोदी यांचे धान्यापासून १८ बाय १० आकाराचे पोट्रेट साकारण्यात आले आहे. कालिका माता मंदिर, तपकिर गल्ली येथे या पोट्रेट चे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मा. स्थायी समिती अध्यक्ष आणि कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते पोट्रेटचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आबा तरवडे, मेघना तरवडे, संजय देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

या पोट्रेट मध्ये गहू, तीन प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, हळीव, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला आहे. पन्नास किलो पेक्षा जास्त धान्याचा वापर केला आहे. हे पोट्रेट गणेश खरे, सुधीर शिंदे आणि त्यांच्या टीमने साकारले आहे. यासाठी सुमारे ३ कलाकार काम करत असून तब्बल १६ तासांचा कालावधी लागला आहे. १६ ते १८ सप्टेंबरच्या दरम्यान हे पोट्रेट पुणेकरांना विनामूल्य बघता येणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news