पंतप्रधानांच्या वंदे मातरम् काव्यांजलीचे उद्या लोकार्पण | पुढारी

पंतप्रधानांच्या वंदे मातरम् काव्यांजलीचे उद्या लोकार्पण

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुश्राव्य कवितांनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही कविता संगीत साज लेऊन श्रोत्यांच्या भेटीला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘वंदे मातरम्… अपनी शान’ या काव्यांजलीचा लोकार्पण सोहळा मोदींच्या वाढदिवशी म्हणजेच रविवारी (१७ सप्टेंबर) दिल्लीत होणार आहे.

मदरलँड इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे या काव्यांजलीची सीडी प्रकाशित करण्यात येणार आहे. संगीतकार संजय हांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या या कवितेचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले इंद्रेशकुमार यांच्या हस्ते होणार आहे. रंगभवनात हा प्रकाशन कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button