पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या दक्षिणेला असलेल्या कात्रज टेकडीवर राजरोसपणे लचके तोड सुरू आहे. एका पठ्ठयाने कात्रज टेकडी सपाट करण्याचा सपाटाच लावला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ही टेकडीफोड सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र प्रशासनालाच टेकडीफोड दिसत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पुणे शहराच्या वैभवामध्ये टेकड्यांचे फार मोठे योगदान आहे. पुणे शहरात शेकडो पर्यावरणवादी संघटना देखील आहेत. मात्र वर्षानुवर्ष टेकड्यांचा ऱ्हास सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नर्हे, आंबेगाव, कात्रज टेकडीवर मोठमोठी बांधकामे दिसू लागली आहेत. प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर टेकडीफोड चार दिवस थांबते आणि त्यानंतर पुन्हा जोमाने सुरू होते. यामुळे टेकड्याच नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.
टेकड्या फोडून त्या ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग करण्यात येत आहे. मागील आठवड्यांपासून नवीन कात्रज बोगद्याजवळ एका माननीयांनी टेकडी सपाटीकरणाचा धडाकाच लावला आहे.