Shilpa Shetty : शिल्पाने पती राज कुंद्राला दिली गुड न्यूज - पुढारी

Shilpa Shetty : शिल्पाने पती राज कुंद्राला दिली गुड न्यूज

मुंबई, पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री शिल्पाने (Shilpa Shetty) पाॅर्नोग्राफी प्ररकरणी ६२ दिवस तुरुंगात राहिलेल्या पती राज कुंद्राला एक गुज न्यूज दिलेली आहे. राज कुंद्रा घरी येताच शिल्पानं त्याला गोड बातमी दिली. ती बातमी अशी की, शिल्पा लवकर एका रिएलिटी शोची अर्थात ‘इंडियाज गाॅट टॅलेंट’ची जज होणार आहे.
याबद्दल सांगतात शिल्पा म्हणाली की, “आपल्या देशात प्रतिभा संपन्न लोक खूप आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे टॅलेंट आहे. त्यामध्ये  ‘इंडियाज गाॅट टॅलेंट’ हा माझा आवडता रिएलिटी शो आहे. त्या शोमध्ये जज म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
Shilpa Shetty
शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) यापूर्वी अनेत रिएलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिलेले आहे. त्यात ‘सुपर डान्सर’, ‘नच बलिए’, ‘जरा नचके दिशा’ यांसारख्या डान्स आधारित रिएलिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिलेले आहे. अशात आता शिल्पाला ‘इंडियाज गाॅट टॅलेंट’ या रिएलिटी शोमध्ये जज पॅनेलमध्ये संधी मिळालेली आहे.
पाॅर्नोग्राफी प्रकरणी शिल्पाच्या पतीला म्हणजेच राज कुंद्राला पोलिसांनी अटक केलेली होती. तब्बल ६२ दिवसांना राज कुंद्राला सोमवारी कोर्टानं ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. अशा परिस्थिती राज कुंद्राने सांगितलं की, “या प्रकरणात मला बळीचा बकरा करण्यात आहे”, असा दावा  राजने केलेल आहे.
Shilpa Shetty
पण, राज कुंद्राला जामीन मिळल्यानंतर शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. शिल्पा त्या पोस्टमध्ये म्हणते की, “मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात”, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं.
हे ही वाचलंत का?

Back to top button