Pre-Oscar : काळ्या साडीत देसी अवतार, प्रियांका चोप्राला पाहायला जमली गर्दी

priyanka chopra
priyanka chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडसह  हॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकतीच प्री-ऑस्कर इव्हेंट पार्टीत ती पोहोचली होती. तिथे तिचा देसी लूकमधील जलवा पाहायला मिळाला. काळ्या साडीने तिच्या सौंदर्यात भर टाकली. साऊथ एशियन एक्सलन्स फिल्म्सच्या प्री-ऑस्कर इव्हेंट पार्टीत प्रियांका चोप्रा हिने काळ्या रंगाची साडी नेसली होती. साडीसोबत तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज कॅरी केलं होतं. ही पार्टी मिंडी कलिंग, कुमेल नानजियानी, अंजुला आचारिया, बेला बाजारिया, मनीष के गोयल आणि श्रुती गांगुली यांनी को-होस्ट केली होती.

या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा अभिनेत्री कॅमेरासमोर स्माईल पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीला साडीत पाहून चाहतेही तिचे जोरदार कौतुक करत आहेत. कोणी तिला अप्रतिम तर, कोणी साडीत तू सुंदर दिसत आहेस, अशी कमेंट देत आहेत. एका नेटकऱ्याने तिला 'गॉर्जियस मम्मी' असे म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयाबराेबर हटके स्टाईलसाठीही ओळखली जाते. प्रियांका सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये सुंदर दिसते. २८ मार्च रोजी अमेरिकेतील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी ऑस्कर अ‍ॅमी शुमर, रेजिना हॉल आणि वांडा स्कायज होस्ट करणार आहेत. यापूर्वी, कोरोना महामारीमुळे अकादमी पुरस्कार ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या भव्य पुरस्कारांचा आनंद लुटता येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने त्यांच्या थेट प्रक्षेपणाचीही व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथून सुरू झालेल्या 'खबर लहरिया' या महिला वृत्तपत्रावर बनवलेल्या 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटालाही यावेळच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन स्टुडिओने नुकतेच शिल्पी सोमाया गौडा यांच्या 'सिक्रेट डॉटर' या कादंबरीसाठी डील फायनल केली आहे. या करारानुसार श्रुती गांगुली या कादंबरीवर चित्रपट लिहिणार असून, सिंगापूरचे रहिवासी अँथनी चेन दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास आणि सिएना मिलर यांना साईन केले आहे.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi ? (@jerryxmimi)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news