सामंथानं नागा चैतन्यला केलं अनफॉलो, फोटो हटवला अन्... | पुढारी

सामंथानं नागा चैतन्यला केलं अनफॉलो, फोटो हटवला अन्...

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आज लाखो लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनी सोशल मीडियावर वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.

या घोषणेनंतर दोघे पुन्हा एकत्र यावेत, असे चाहत्यांना वाटत होते. पण, तसे अजिबात झाले नाही आणि आता सामंथाने असे काही केले ज्यामुळे तिला आता नागा चैतन्यसोबत कोणतेही नाते नको असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून नागा चैतन्यला अनफॉलो केले आहे. इतकंच नाही तर नागा चैतन्यला अनफॉलो करण्यासोबतच समांथाने घटस्फोटाशी संबंधित तिचे फोटो आणि पोस्टही डिलीट केली आहे.

काही दिवसांपूर्वी तिने तिच्या लग्नातली साडीदेखील नागा चैतन्यला परत केली होती. लग्नात समंथाने तिच्या आजीच्या सासूबाईंची साडी नेसली होती. सामंथा आणि नागा चैतन्य दोघेही सध्या आपापल्या आयुष्यात खूप बिझी आहेत आणि दोघेही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत.

सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय- कधी कधी इतकी शक्ती आपल्यामध्ये असते की, सर्वांना दिसते. कधी-कधी हे एक छोटंसं स्पार्क असतो, जे खूप शांतीने म्हणतं की-पुढे जात राहा, तुम्हाला ते मिळत राहील.

सामंथा आगामी ‘यशोदा’ चित्रपटात जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. या स्टंटसाठी ती हॉलिवूडच्या स्टंटमन यानिक बेनकडून ट्रेनिंगही घेत आहे. यासोबतच ती ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शाकुंतलम’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दुसरीकडे, नागा चैतन्यबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागा चैतन्य आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार असून त्यात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button