शनाया कपूर : बॉलीवूड एंट्रीपूर्वीच खरेदी केली कार | पुढारी

शनाया कपूर : बॉलीवूड एंट्रीपूर्वीच खरेदी केली कार

नवी दिल्ली :

कपूर खानदानची बेटी लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वीच तिने अत्यंत महागडी कार खरेदी केली. अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची कन्या शनाया कपूर असे तिचे नाव.

शनाया कपूरने आपल्या कार कलेक्शनमध्ये ‘ऑडी क्यू 7’ या कारची भर घातली. या गाडीची किंमत 80 लाख रुपये असल्याचे समजते. अशा या शनायाच्या फिल्मी कारकिर्दीचा विचार करावयाचा झाल्यास लवकरच ती करण जोहर यांच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ‘बेधडक’ असे या चित्रपटाचे नाव असून त्यामध्ये शनाया गुरफतेह सिंग पीरजादा व लक्ष्य लालवाणी यांच्यासोबत सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच तिने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

Back to top button