Priyanka म्हणते, नाव हटवायचं वेगळं कारण होतं, लोकांनी घटस्फोटापर्यत नेलं

Priyanka म्हणते, नाव हटवायचं वेगळं कारण होतं, लोकांनी घटस्फोटापर्यत नेलं

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra) हिने मागील महिन्यात आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून 'जोनास' हे आडनाव काढून टाकल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. यामुळे प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनास याच्या नात्याबद्दल अनेकांनी तर्कवितर्क लावले होते. एवढेच नाही तर दोघेजण घटस्फोट घेतात की काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. आता प्रियांकाने जोनास आडनाव का हटवले? याचा खुलासा केला आहे.

प्रियांकाने (Priyanka Chopra) नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत जोनास आडनाव का हटवले? यांचा खुलासा करत सोशल मीडियावर लावलेल्या घटस्फोटोच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी तिने आमच्या नात्याबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. याचे ठोस कारण दुसरे- तिसरे नसून फक्त माझे नाव जुळले पाहिजे या दुष्टीकोनातून असे केले असल्याचे तिने सांगितले आहे. यात तिने ट्विटरच्या वापरकर्त्यानो, माझे नाव जुळले पाहिजे. म्हणून मी असे नाव ठेवले आहे. लोकांसाठी ही एवढी मोठी समस्या का बनली आहे याचे मला आश्चर्य वाटते. असे म्हटले आहे.

याशिवाय प्रियांकाची आई मधु चोप्राने देखील यावर स्पष्टीकरण देत याबाबतचा खुलासा केला आहे. यात तिने 'प्रियांका आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे म्‍हटलं आहे.

प्रियांकाने लग्नानंतर इंस्टाग्राम आणि ट्विटरवर 'प्रियांका चोप्रा' हे नाव बदलत 'प्रियांका चोप्रा जोनास' असे ठेवले होते. परंतु, मध्यतरी तिने अचानक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास नाव हटविले. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटोच्या चर्चा देखील पसरू लागल्या. यानंतर प्रियांकाने याचा खुलासा केला आहे.

प्रियांका सध्या तिच्या आगामी 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' 'The Matrix Resurrections' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर रिलीज झाले आहे. 'द मॅट्रिक्स' च्या चौथ्या भागात प्रियांका 'सती'ची भूमिका साकारली आहे. याशिवाय प्रियांकाने 'द व्हाइट टायगर' आणि 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात झळकली. प्रियांका नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून अपडेटस देत असते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news