Sayli Kamble : इंडियन आयडल १२ फेम सायलीने केले साखरपुडा कार्यक्रमातील फोटो शेअर | पुढारी

Sayli Kamble : इंडियन आयडल १२ फेम सायलीने केले साखरपुडा कार्यक्रमातील फोटो शेअर

मुंबई , पुढारी ऑनलाईन : ‘इंडियन आयडल’ च्या १२ व्या पर्वाचे व्यासपीठ गाजवलेली गायिका सायली कांबळे ( Sayli Kamble ) तिचा बॉयप्रेंड धवलसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. सध्या नुकताच सायलीचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुढ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

सायलीने ( Sayli Kamble ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर साखरपुढ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सायली पिच रंगाच्या ड्रेसमध्ये आणि धवल जांभळ्या- निळ्या रंगाच्या शेरवानीत दिसत आहे. याशिवाय फोटोत दोघांच्या हातात एक अंगठी असल्याचेदेखील दिसत आहे. यावरून दोघांचा नुकताच साखरपुढा पार पडल्याचे समजले.

याशिवाय सायलीने तिच्या इंन्स्टाग्रामवर धवलने लग्नासाठी प्रपोज केल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सायलीने मिनी स्कर्ट घातला असून धवलने हटके स्टाईलने तिला प्रपोज केलं आहे. यातील खास म्हणजे. यावेळी फुलांची आणि फुग्याची सजावट केली होती.

धवलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. ‘मी नेहमी तुझ्यासोबत कायम असेन, तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन आणि आयुष्यभर तुझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करेन.’

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होताच सायलीवर कॉमेंन्टसचा पाउस पडत आहे. यात काही जणांनी सायलीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सायलीने घराची परिस्थिती बेताची असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. तिचा इंडियन आयडल १२ पर्यत प्रवास खूपच कठीण असल्याचे देखील म्हटले होतं. सायलीचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayli Kamble (@saylikamble_music)

Back to top button