कोल्हापूर : बेछूट गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : बेछूट गोळीबार प्रकरणी मानसिंग बोंद्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा

अंबाई टँक कॉलनी परिसरात केलेल्या बेछूट गोळीबार प्रकरणी दसरा चौक येथील श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग विजय बोंद्रे (वय ३५, रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) फेटाळला.

काही दिवसांपूर्वी मानसिंग बोंद्रे यांनी साथीदारांसमवेत अंबाई टँक कॉलनी परिसरात मध्यरात्री गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अभिषेक बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मानसिंग यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, अटक कारवाई टाळण्यासाठी संशयित मानसिंग बोंद्रे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. आज (दि. २३) दुपारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मानसिंग बोंद्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल आणि संशयित मानसिंग बोंद्रे यांच्या वतीने ॲड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले अटकपूर्व जामीन अर्जाच्या निकालाकडे शहराचे लक्ष लागून राहिले होते.

अशी घडली होती घटना…

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मानसिंग बोंद्रे यांचे चुलत सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय 33, रा. अंबाई टँक कॉलनी, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली. अंबाई टँक परिसरात अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री दाखल झाला होता.

चौकशीअंती मानसिंग बोंद्रे यांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाल्याने आणि गोळीबार करतानाची चित्रफित सोशल मीडियावर तत्काळ व्हायरल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी नारे यांनी सांगितले. अभिषेक बोंद्रे आणि संशयित मानसिंग बोंद्रे नात्याने चुलत सावत्र भाऊ आहेत.

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि संस्थेच्या शेत जमिनी आणि इतर मालमत्तांच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू आहेत. या वादातून मानसिंग बोंद्रे यांनी, 'अभिषेक बोंद्रे यांना आणि तुझ्या खानदानला संपवितो तुझा गेम करतो' अशी धमकीही संशयितांनी दिल्याचे अभिषेक बोंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आपणाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच मानसिंग बोंद्रे यांनी स्वतःजवळ असलेल्या रिव्हॉल्वरमधून अंदाधुंद गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. असेही त्यात म्हटले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. संशयित मानसिंग बोंद्रे यांचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news