‘आरआरआर’ सुरु हाेण्‍यास उशीर झाला, प्रेक्षकांनी थेट खिडक्या फोडल्या

प्रेक्षकांनी सिनेमागृहाच्या खिडक्या फोडल्या
प्रेक्षकांनी सिनेमागृहाच्या खिडक्या फोडल्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील अन्नपूर्णा सिनेमागृहाच्या खिडक्या फोडण्यात आल्य़ा. तांत्रिक कारणामुळे आरआरआर चित्रपट थोडा उशीरा सुरू करण्यात  आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहाच्या खिडक्या फोडल्या. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

एस एस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'RRR' सिनेमागृहांमध्ये आज देशभरात प्रदर्शित झाला. साऊथच्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच प्रचंड लोक थिएटरच्या बाहेर जमून जयघोष करत आहेत. तर काहींनी अभिनेता रामचरणच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. याचे व्हिडीओही ट्विटर व्हायरल झाले आहेत.

अनेक दिवसांपासून आरआरआर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रामचरण, आलिया भट्ट, एनटीआर ज्युनिअर, अजय देवगण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला की, प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक करत आहेत. पण, आज आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील सिनेमागृहाच्या खिडक्या त्याच दरम्यान या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे, जी काही फारशी चांगली नाही. वास्तविक, चित्रपट सुरू होण्यास थोडा उशीर झाल्यामुळे प्रेक्षकांनी नुकसान केले आहे.

थिएटरच्या खिडक्या तोडल्या

चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबल्यानंतर लोकांनी खिडक्याचे कुंपण काढून टाकले. अनेक खिडक्या तोडल्या. याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकांनी थिएटरच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थितीही या छायाचित्रांमध्ये पाहायला मिळते. हा प्रकार होताच पोलीसही घटनास्थळी हजर झाले.

बाहुबली चित्रपटाचे रेकॉर्ड मोडणार

कोरोना महामारीमुळे आरआरआर चित्रपटाचे प्रदर्शन  थांबवण्यात आले. मात्र आता हा चित्रपट कोणत्याही व्यत्ययाशिवाय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी तुफान गर्दी आहे. पण, काही ठिकाणी राडाही झालेला दिसतो. सोशल मीडियावर या चित्रपटाचे फोटोज व्हायरल होत आहेत. हा चित्रपट बाहुबली चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news