पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्युनियर एनटीआर चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेतो. तो मोठा स्टार असूनही त्याचा साधेपणा चाहत्यांना भावताे. चित्रपटाच्या सेटवर वेळत पोहोचणं असो वा आपल्या भूमिकेसाठी मेहनत. यामध्ये ताे नेहमीच अग्रेसर असताे. त्याचमुळे तो चित्रपटांमध्ये यशस्वी ठरतो. प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळतं. तुम्हाला माहिती आहे का, ज्युनियर एनटीआर हा मृत्यूच्या जबड्यातून परत आला आहे. ज्या ठिकाणी त्याचे वडील आणि भावाचा अपघात झाला होता, त्याठिकाणी एनटीआरचाही कारचा अपघात झाला होता.
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते ज्युनियर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्णा यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशात कवली येथे एका लग्नसमारंभाला जाताना नंदमूरी यांच्या कारचा अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात त्याच जागी झाला, जिथे काही वर्षांपूर्वी नंदमूरी यांचा मोठा मुलगा राम नंदमूरीचाही कार अपघातात मृत्यू झाला होता.
नंदमूरी हरिकृष्णा यांचा मुलगा राम नंदमूरी एक चित्रपट निर्माता होता. अकूपामु येथे त्यांच्या कारला अपघात झाला होता. वडील आणि भावाप्रमाणेच एनटीआर ज्यु.चा देखील याच मार्गावर अपघात झाला होता. काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. सुदैवाने तो या अपघातातून बचावला हाेता. २००९ मध्ये जेव्हा एनटीआर ज्यु. एका कार्यक्रमातून परत येत होता. तेव्हा त्याच्या कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती.
साऊथचा ॲक्शन स्टार ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे, १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते एनटी रामारावचा नातू म्हणून त्याची ओळख आहे. ॲक्शन, डान्स आणि अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये एनटीआर ज्युनियरचा दबदबा आहे. यासाठीच त्याला हिटस्टार देखील म्हटलं जातं.
ज्युनियर एनटीआरने बालपणापासून चित्रपट करिअरची सुरुवात केली. आजोबांनी दिग्दर्शित केलेल्या ब्रह्मर्शी विश्वामित्रमध्ये त्याने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. एनटीआर ज्युनियरचं खरं नाव तारक असे आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. २००१ मध्ये स्टुडेंट नंबर १ चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती.
एनटीआर ज्युनियरने टीव्हीवर बिग बॉस (तेलुगु) शो होस्ट केलं आहे. २०१७ मध्ये हा शो सर्वात हिट शोचाचा एक भाग होता. एनटीआर ज्यु. चे नाव फोर्ब्स इंडिया सेलेब्रिटीजच्या यादीत दोनवेळा होते. एनटीआर ज्यु. ॲक्शन चित्रपटांतील वेगवेगळ्या अवतारासाठी ओळखला जातो.
२००९ मध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी एनटीआर ज्युनियर खूप जखमी झाला होता. अपघातातूनही तो बचावला हाेता.
हेही वाचलं का?