Shraddha Kapoor Breakup : चार वर्षांच्या डेटिंगनंतर श्रद्धा कपूरचा ब्रेकअप? | पुढारी

Shraddha Kapoor Breakup : चार वर्षांच्या डेटिंगनंतर श्रद्धा कपूरचा ब्रेकअप?

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेक दिवसांपासून फोटोग्राफर रोहन श्रेष्ठला डेट करत असल्याने चर्चेत होती. श्रद्धा आणि रोहन जवळपास ४ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिप असल्याने चाहत्यांना हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे वाटले होते. परंतु, श्रद्धा कपूरच्या चाहत्यासाठी धक्कादायक वृत्त समोर आले आहे. श्रद्धा कपूरचा ब्रेकअप ( Shraddha Kapoor Breakup ) झाल्याची माहिती सोशल मीडियावर मिळत आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन दोघांनी त्याच्या नाते अधिकृत घोषित केलेले नव्हते. परंतु, सोशल मीडियावर दोघेजण लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरू होती. अनेक वेळा दोघांना एकत्रित डिनर डेटवर पाहिले गेल्याने रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. श्रद्धा कपूर आणि रोहन एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, श्रद्धाने तिचा वाढदिवस गोव्यात खास मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा केला. परंतु, या पार्टीत रोहन सहभागी झालेला नव्हता. यावेळी तो दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये बिझी नसल्याची माहिती मिळाली होती. यावरून श्रद्धा कपूर आणि रोहन याच्यात मतभेद सुरू असल्याचे बोलले जात होते. याच दरम्यान सध्या दोघांचे ब्रेकअप ( Shraddha Kapoor Breakup ) झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धा आणि रोहन यांचा ब्रेकअप नेमका कशाने?, खरोखरचं झाला आहे का? याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

याच दरम्यान श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत ब्रेकअपचा खुलासा केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘और सुनाओ??? 💜’ असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी श्रद्धाला अनेक प्रश्न विचारले आहेत. यात एका युजर्सने ‘खरचं तुझा ब्रेकअप झाला का?’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘ब्रेकअप होण्यास नेमकं कारण काय?’, ‘४ वर्षानंतर कसा काय ब्रेकअप झाला’ असे म्हटले आहे. तर श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर याने या फोटोच्या कॉमेन्टमध्ये ‘तुझी आठवण येते, माझी लीडल रानी’. असे लिहिले आहे. तर काही युजर्सनी हार्ट ईमोजी शेअर केले आहेत.

श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती रणबीर कपूरसोबत आगामी ‘लव रंजन’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘चालबाज इन लंडन’, ‘स्त्री २’ आणि विशाल फुरिया याचा ‘नागीन’ चित्रपट आहेत. श्रद्धा शेवटची टायगर श्रॉफसोबत ‘बागी ३’ मध्ये दिसली होती.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button