gangubai kathiawadi : आलियाच्या चित्रपटासाठी ‘या’ अभिनेत्याने अख्खं थिएटर केलं बुक | पुढारी

gangubai kathiawadi : आलियाच्या चित्रपटासाठी 'या' अभिनेत्याने अख्खं थिएटर केलं बुक

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर आलिया भट्टने गेल्या 10 वर्षांत लाखो लोकांना आपले फॅन बनविले. हे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही आहेत. आलियाचा चाहता असलेल्या पाकिस्तानमधील एका अ‍ॅक्टरने तर तिचा नवा चित्रपट पत्नीला दाखवण्यासाठी संपूर्ण थिएटरच बूक केले.

आलियाचा नुकताच रीलिज झालेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे. संजय लिला भन्साळी यांच्या या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाला होता. मात्र, न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यामध्ये आलियाचा अभिनय अत्यंत कसदार झाला आहे. हाच चित्रपट पत्नीला दाखविण्यासाठी पाकिस्तानी अभिनेता मुनीब बटने संपूर्ण थिएटरच बूक केला.‘गंगुबाई काठियावाडी’ हा 100 कोटींच्या क्‍लबमध्ये प्रवेश करणारा आलियाचा कारकिर्दीतील पाचवा चित्रपट ठरला आहे.

Back to top button