Panjshir Valley : तालिबानला पहिला दणका, पंजशीर खोऱ्यातील संघर्षात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा

अफगाणिस्तान
अफगाणिस्तान

काबूल; पुढारी ऑनलाईन : तालिबाननं अफगाणिस्तान मधील ३३ प्रातांवर कब्जा केलाय. मात्र, अफगाणिस्तान मधील असा एक प्रांत आहे ज्यावर तालिबान्यांना ताबा मिळवता आलेला नाही. पंजशीर (Panjshir Valley) असे त्या प्रांताचे नाव आहे. चारही बाजूने डोंगराळ भाग असणारा हा प्रांत आहे.

पंजशीर खोऱ्यावर (Panjshir Valley) कब्जा करण्यासाठी तालिबान्यांनी कारी फसीहूद दीन हाफिजुल्लाह याच्या नेतृत्वात सैनिक पाठवले होते. मात्र, बगलान प्रांतातील खोऱ्यात पंजशीरच्या सैनिकांनी त्यांच्यावर घातक हल्ला केला. यात अहमद मसूदच्या सैन्याने तालिबानच्या ३०० दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला आहे. तसेच पंजशीरच्या सैनिकांनी अनेक तालिबान्यांना ताब्यात घेतले आहे.

अहमद शाह मसूद यांना पंजशीर प्रांताचे शेर मानले जाते.

अफगाणिस्तानमधील टीव्ही चॅनेल टोलो न्यूजने दावा केला आहे की पंजशीरच्या लढवय्यांनी रस्त्यामध्ये तालिबान्यांवर हल्ला केला. त्यात ३०० जण मारले गेले आहेत.

दरम्यान, तालिबानने इशारा दिला आहे की जर अहमद मसूदच्या सैन्याने शांततेच्या मार्गाने शरणागती पत्करली नाही तर त्यांच्यावर घातक हल्ला केला जाईल. तालिबानाच्या या धमकीला अहमद मसूदने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानच्या धमकीकडे दुर्लक्ष करत अहमद मसूदच्या सैन्याने तालिबानाच्या ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दरम्यान, पंजशीरला लागून असलेल्या बगलान प्रांताच्या अंदराब जिल्ह्यात मोठ्या संख्येने तालिबान्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.

अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, तालिबान सोबत युद्ध आणि चर्चा या दोन्हीसाठी आम्ही सज्ज आहोत.

तालिबानला टक्कर देण्यासाठी अहमद मसूदने अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक लढवय्ये मिळून आपली सेना बनवली आहे.

अफगाणी हिरो होते अहमद शाह मसूद

१९९० च्या दशकात अहमद शाह मसूद यांनी तालिबान विरुद्धच्या संघर्षात मोठी प्रतिष्ठा मिळवली. भारताने त्यांची मदत केली आहे. असे म्हटले जाते की जेव्हा अहमद शाह मसूद तालिबानच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते तेव्हा भारताने त्यांना एयरलिफ्ट करुन त्यांच्यावर ताजिकिस्तानच्या फर्कहोर एयरबेसवर उपचार केले होते. भारताचा हा विदेशातील पहिला सैन्य तळ आहे. नार्दन अलायन्सच्या मदतीसाठी भारताने हा सैन्य तळ उभारला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news