आजचे राशिभविष्य (दि. २३ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २३ ऑगस्ट २०२१)

मेष

लाभदायक दिवस ठरेल, व्यावसायिक उत्कर्ष होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेमप्रकरणांमध्ये यश मिळेल, प्रवासाचे योग संभवतात, परस्परांमध्ये सामंजस्य निर्माण होईल.

वृषभ –

प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कौतुकास्पद कार्य कराल, व्यावसायिक उन्नती होईल.

मिथुन –

संभ्रमित अवस्था होईल, आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस, नियमांचे पालन आवश्यक आहे, धार्मिक कामांमध्ये सहभाग घ्याल, संयम आवश्यक आहे.

कर्क –

अस्वस्थता राहील, मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. जुने आजार उद्भवतील, आर्थिक नियोजन आवश्यक आहे, उष्णतेचे विकार होण्याची संभावना.

सिंह

जीवलगांचा सहवास लाभेल, व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे योग, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल, जोडीदाराची साथ लाभेल.

कन्या-

नोकरदारांसाठी लाभदायक दिवस, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग संभवतात. संवादाने प्रश्न सुटतील, मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.

तूळ –

प्रेमप्रकरणांत अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा, संयम आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्ययन करणे गरजेचे.

वृश्चिक –

क्रोधावर नियंत्रण आवश्यक, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, कोणालाही शब्द देऊ नका, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.

धनु –

छोटे प्रवास घडतील, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्वास वाढेल, जवळच्या लोकांची मदत होईल, नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल.

मकर –

आहारावर नियंत्रण आवश्यक आहे, जबाबदारीची जाणीव होईल, आत्मचिंतनाची गरज आहे, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.

कुंभ –

आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, अतिथ्यामध्ये दिवस जाईल.

मीन –

अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कर्जाच्या प्रकरणांमध्ये अडचणी येतील.

Back to top button