Ola ने घेतला मोठा निर्णय ; १४४१ इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवल्या

Ola electric scooters
Ola electric scooters
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :  इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना सध्या देशातील विविध भागात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दुचाकी उत्पादक कंपनी Ola ने आपल्या १४४१ युनिट्सच्या गाड्या परत घेतल्या आहेत.पुण्यात २६ मार्चला झालेल्या आगीच्या घटनेचा सध्या तपास सुरू आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमधील प्राथमिक मूल्यांकनातील ही एक वेगळीच घटना असल्याचे आढळले आहे. आग नेमकी कशामुळे लागली?  आग लागू नये म्हणून आणखी काय करता येईल याबद्दल समिती नेमण्‍यात आल्‍याचे  Ola कंपनीच्च्या‍ अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्‍कूटरला लागलेल्‍या आगीच्‍या घटनांनंतर Ola Electric च्या वतीने सांगण्यात आले आहे की, या स्कूटर्सची आमच्या कंपनीतील सर्विस इंजीनियर्सकडून तपासणी केली जाईल. बॅटरी सिस्टम, थर्मल सिस्टम तसेच सुरक्षा यंत्रणा तपासल्या जातील. आग लागण्याच्या घटनांनंतर  आतापर्यंत ३२१५ वाहने मागे घेण्यात आली असल्याचे कंपनीच्‍या सूत्रांनी सांगितले

अलीकडे देशातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे. त्‍यामुळे उत्पादकांना त्यांची वाहने परत मागवावी लागली आहेत. Okinawa Auto-tech सोबत, Pure EV ने देखील सुमारे 2,000 इलेक्ट्रिक स्कूटर परत मागवल्‍या आहेत.  आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या बाबत कंपन्‍यांनी ठाेस उपाययाेजना करावी, असे सरकारने बजावले आहे.

असा आहे 'अप्पा बळवंत चौकाचा' इतिहास..

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news