पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय तपास यंत्रणा कोणासाठी काम करत आहे? न्यायालय कोणासाठी काम करत आहे? असे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय सुरक्षा व्यवस्था हाच एक मोठा घोटाळा आहे, असा आराेप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेविरूद्ध बोलणाऱ्यांना केंद्राची सुरक्षा आहे. गुन्हेगारांना भाजपने पाठबळ दिलेलं आहे. गुन्हेगारीसाठी भाजपला मळमळ का होत आहे? असा करत भाजपची 'एमआयएम'शी छुपी युती आहे. हिंमत असेल तर समोर येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.
किरीट सोमय्यांवर शनिवारी झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या हे आरोपी आहेत. या घोटाळ्याप्रकरणी लोकांमध्ये संताप आहे. त्यांचा शौचालय घोटाळादेखील लवकरच समोर येईल. यासाठी सोमय्यांचे युवक प्रतिष्ठान अकाउंट तपासयला हवे. सोमय्या यांच्या संस्थेला निधी कुठुन मिळाला, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. देशद्रोही गुन्हेगारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. देशद्रोहींवर दगड पडतातच. विक्रांत घोटाळा म्हणजे देशाची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था जर धोक्यात कोणी आणलेली असेल तर त्याला महाराष्ट्रातील अपरिपक्व विरोधी पक्ष जबाबदार आहे. केंद्राकडे जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. राणा दाम्पत्य आणि मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना माझं समर्थन आहे आणि शिवसेना देखील समर्थन करेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा