No Time to Die : सर्वाधिक हॉट सीन देणारा जेम्स बाँड कोण?

James Bond No Time to Die
James Bond No Time to Die

जेम्स बाँड मालिकेतील २५वा चित्रपट No Time to Die प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बाँड पटांची मोहिनी जगभरातील सिनेरसिकांवर आहे. रहस्य, जबरदस्त अॅक्शन, दमदार कथानक आणि त्याच्या जोडीने सेक्स आणि रोमान्सचा तडका असा मसाला असलेले जेम्स बाँडचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवतात.

देखणा आणि रुबाबदार जेम्स बाँड आणि त्याच्या जोडीने असलेला असलेली बाँड गर्लनी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. बाँड मालिकेतील काही रोमँटिक सीन तर अजरामर ठरले आहेत.

बाँड साकारणाऱ्या अभिनेत्यांत सिन कॉनरी याने साकारलेला बाँड रसिकांच्या मनात आजही ठळक आहे. गोल्डफिंगर या त्याचा गाजलेला सिनेमा. यात बाँड गर्ल शर्ली इटनसोबतचा रोमँटिक सीन बराच गाजला होता.

सध्या बाँड साकारत असलेल्या डॅनियल क्रेगने काँटम ऑफ सोलस या चित्रपटात अॅक्शन सीनसोबतच रोमँटिक सीनमध्ये जलवा दाखवला आहे. काँटम ऑफ सोलसमध्ये क्रेगची बाँड गर्ल होती जेमा आर्थर्टन. या सिनेमातील दोघांतील हॉट सीन चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.

सर्वाधिक रोमँटिक बाँड कोण?

Fluttr या डेटिंग अॅपने कोणत्या जेम्स बाँडने सर्वाधिक महिला सोबत रोमान्स केला (सिनेमात बरं का..!), याचं विश्लेषण प्रसिद्ध केलेलं आहे.

रॉजर मूर आणि पोल इव्हानोव्हा ए व्ह्यू टू किल या सिनेमात
रॉजर मूर आणि पोल इव्हानोव्हा ए व्ह्यू टू किल या सिनेमात

रॉजर मूरच्या वाट्याला सर्वाधिक रोमँटिक सीन आले होते. त्याने साकारलेल्या ७ बाँड पटात मिळून एकूण १९ बाँड गर्लसोबत त्याने रोमान्स केला आहे.

रॉजर मूरच्या व्ह्यू टू किल या सिनेमात पोल इव्हानोव्हाने केजीबीच्या गुप्तहेराची भूमिका केली आहे.

हा सिनेमा रिलिज झाल्यानंतर दोघांतील हॉट सीन्सचीच चर्चा जास्त झाली होती.

जॉर्ज लाझेंबी यांनी एकाच चित्रपटात बाँडची भूमिका निभावली.

पण या एकाच चित्रपटात बाँडने ६ खून केले, तर ३ अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे.

सीन कॉनरी आणि शर्ली इटन यांचा गोल्डफिंगर चित्रपटातील सीन फार गाजला होता
सीन कॉनरी आणि शर्ली इटन यांचा गोल्डफिंगर चित्रपटातील सीन फार गाजला होता

सीन कॉनरी यांना बाँड पटात एकूण ७०२ मिनिटांचा स्क्रीन टाईम मिळाला आहे,

त्यापैकी प्रत्येक ५४ मिनिटाला एक तरी हॉट सीन त्यांच्या वाट्याला आला होता. १३ अभिनेत्रींशी त्यांनी रोमान्स केला आहे.

पिअर्स ब्रॉस्नान एकूण ४ बाँड सिनेमे दिले आहेत. ४ सिनेमांत मिळून एकूण १०८ खून दाखवले आहेत, तर ९ बाँड गर्ल सोबत पिअर्सने रोमान्स केला आहे..

सध्याचा जेम्स बाँड डॅनिअल क्रेग सर्वांत खतरनाक ठरलेला आहे.

डॅनिअल क्रेग सर्वांत खतरनाक

डॅनिअल क्रेगने साकारलेल्या आतापर्यंतच्या सर्व बाँड पटात मिळून २७९ खून बाँडच्या हातून घडलेले आहेत.

तर ६ बाँड गर्लसोबत क्रेगने रोमान्स केला आहे.

तर टिमोथी डाल्टन हा सर्वांत 'सभ्य' बाँड ठरला आहे. टिमोथी डाल्टनने दोन चित्रपटांत बाँड साकारला आहे.

या दोन चित्रपटांत मिळून त्याच्या ४ प्रेयसी दाखवण्यात आल्या आहेत. दोन चित्रपटांत टिमोथीने २० खून केलेले आहेत.

डॅनिएल क्रेग आणि कॅटरिन मरिनो यांच्यातील एक सीन…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news