नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे

नाशिक : पंचवटी मनपा प्रभारी विभागीय अधिकारीपदी योगेश रकटे
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे प्रभारी विभागीय अधिकारी म्हणून मुख्यालयात अधीक्षक असलेले योगेश रकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कैलास राभडिया हे डिसेंबर महिन्यात विभागीय अधिकारीपदीवरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पंचवटी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नरेंद्र शिंदे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच त्यांची विभागीय अधिकारी पदावरून उचलबांगडी झाली की, करून घेतली, या चर्चेला उधाण आले आहे.

पंचवटी विभागाचा प्रभारी विभागीय अधिकारी म्हणून योगेश अरुण रकटे यांनी पदभार स्वीकारला असून, ते मनपा मुख्यालय येथे दीड वर्षापासून कर विभागाच्या अधीक्षक पदावर सेवेत आहेत. तसेच यापूर्वी आरोग्य विभागाच्या अधीक्षक पदावरही त्यांनी सहा वर्षे काम केले आहे. तर नुकत्याच झालेल्या नाशिक मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअमनपदी त्यांची निवड झाली आहे. प्रभारी विभागीय अधिकारीपदी शिंदे असताना महापालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे वसुली मोहिमेत जाहिरात व परवाने विभागाने विक्रमी वसुली केली होती. परंतु त्यांच्याकडे अगोदरपासून असलेले पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंतापदाची जबाबदारी पाहता व पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना जास्त वेळ द्यावा लागत असल्याने त्यांना विभागीय अधिकारीपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया हे सेवानिवृत्त होत असतानादेखील योगेश रकटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यावेळी रकटेंचा नंबर लागू शकला नाही व त्याजागी नरेंद्र शिंदे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली होती.

का झाली असावी बदली?
पंचवटी प्रभारी विभागीय अधिकारीपदी शिंदे असताना अनेक ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली होती. मात्र शाही मार्ग तपोवन, पेठरोडच्या पाटाजवळील झोपड्यांचे अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या वाहनांवर, जेसीबीवर तसेच कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली होती. तसेच कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळसह काही कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात शिंदे यांनी बचावात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठामपणे व फिर्यादी म्हणून उभे राहिले नसल्याने व मनपाकडून अनधिकृत बांधकामाच्या सर्व्हेची माहिती वेळेत सादर न झाल्याने शिंदेंना मुख्यालयातून नोटीसही बजाविली होती. त्यांनी उत्तर सादर दिले होते. मात्र त्यामुळेच त्यांची अचानक बदली झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news