Sidharth Anand : फायटर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बिझी | पुढारी

Sidharth Anand : फायटर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बिझी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा दूरदर्शी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आहे.(Sidharth Anand ) आनंद त्याच्या प्रत्येक दिग्दर्शनाच्या प्रयत्नाने भारतीय चित्रपटाला एक अनोखा दर्जा मिळवून देत आहेत. आनंद यांनी समीक्षक आणि चित्रपटप्रेमींना नेहमीच त्यांचा कामाने भुरळ घातली आहे. आता तो फाटर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. (Sidharth Anand )

दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करून नेहमीच त्यांनी अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना दिला. आनंद यांचा फिल्मोग्राफी प्रवास उल्लेखनीय आहे. उत्तम कथा आणि जबरदस्त दिग्दर्शन यांची सांगड घालत नेहमीच त्यांचा चित्रपटाचं कौतुक होत.

“सलाम नमस्ते” मधून सिद्धार्थ आनंद याने २००५ मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आनंदच्या अतुलनीय यशाचा सिलसिला इथून सुरू होऊन आजपर्यंत तो अखंडित सुरू आहे. त्यांचा अनोख्या दिग्दर्शन पद्धतीने आणि कथाकथनाच्या शैलीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ज्यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीला उत्तम चित्रपट मिळाले आहे.

आनंदच्या ब्लॉकबस्टर्सनी भारतीय सिनेमाला अनोखा दर्जा दिला आहे. “बचना ए हसीनो,” “अंजाना अंजानी,” आणि “बँग बँग” चित्रपट प्रेक्षकांना आजही तितकेच आवडतात.

सिद्धार्थ आनंद यांच्या “वॉर” ने बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडला होता. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा अफलातून अभिनय असलेला, जबरदस्त अँक्शन, आकर्षक कथा आणि उत्कृष्ट अभिनयासाठी या चित्रपटाचं कौतुक करण्यात आले. “वॉर”द्वारे आनंदने पुन्हा सिद्ध केले की तो प्रेक्षकांना उत्कृष्ट मनोरंजन देऊ शकतो. त्याचा सर्वात अलीकडचा “पठाण” हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. शाहरुख खान याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे.

दर्जेदार चित्रपटाचं दिग्दर्शन सुरू ठेवून हा दूरदर्शी दिग्दर्शक सध्या त्याच्या पुढच्या फायटर चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Back to top button