नाशिक मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news
नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी डोकेदुखी ठरत असून अ‍ायुक्तांनी चालू आर्थिक वर्षात पन्नास कोटी वसुलीचे उदिद्ष्ट दिले आहे. त्यासाठी करसंकलन विभागाने सहाही विभागांसाठी पंधरा विशेष पथकांची नेमणूक केली असून त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. गाळेधारकांनाही पाच हप्त्यांमध्ये भाडे अदा करण्याची सवलत दिली आहे. जे गाळेधारक सहकार्य करणार नाही त्यांचे गाळे सील करण्याची धडक कारवाई होणार आहे.

आयुक्तांनी चालू आर्थिक वर्षात नाशिककरांवर करवाढ लादणे टाळत उत्पन्नासाठी वसुलीवर जादा जोर दिला आहे. दोनशे कोटी मालमत्ता कर, पंचात्तर कोटी पाणीपट्टी व पन्नास कोटी गाळे भाडे वसुलीचे टार्गेट दिले आहे. करसवलत योजनेमुळे मालमत्ता कर वसुली सुसाट सुरु आहे. पण मनपाच्या मालकीचे गाळ्यांचे भाडे वसुली तापदायक ठरत आहे. गतवर्षीची ३६ कोटी व चालू वर्षातील १४ कोटी अशी एकूण पन्नास कोटी वसुली करसंकलन विभागाला करावी लागणार आहे. त्यासाठी करसंकलन विभागाने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. सहाही विभागांत पंधरा विशेष पथके वसुलीसाठी नियुक्त केले आहेत. त्यात ४८ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मनपाचे सहाही विभाग मिळून ६२ व्यापारी संकुल असून एकूण दोन हजार ४५७ गाळे व ३८३ ओटे आहेत. रेडिरेकनर दर लागू झाल्यापासून ते आतापर्यंत गाळेधारकांकडे एकूण पन्नास कोटी भाडे थकले आहेत. विशेष पथकातील कर्मचारी प्रत्येक थकबाकीदाराला भेट देत त्यांच्याकडून वसुली करतील. शिवाय थकबाकीदारांना भाडे अदा करण्यासाठी पाच हप्त्यांची सवलत देण्यात येईल. हप्त्यांवर कर भरण्यास तयारी दर्शवल्यास त्याच्याकडून शंभर रूपयांचे हमीपत्र व पाच धनादेश आगाऊ घेतले जातील. थकबाकीदारांनी सहकार्य करणे टाळल्यास थेट धडक मोहीम राबवत गाळे जप्त करण्याचे अधिकार विशेष पथकाला दिले आहेत.

विशेष पथकावरील जबाबदारी
– भाडे थकबाकीच्या रक्कमेनुसार याद्या तयार कराव्यात
– जप्तीच्या कारवाईचे चित्रीकरण करावे
– भाडेकराराची मुदत संपली असल्यास नुतनीकरण करणे
– अधिकार्‍यांनी कर्तव्यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करणे

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news