नंदुरबार : बापरे ! शेतातील विहिरीत आढळला दहा फुटी अजगर

नंदुरबार : बापरे ! शेतातील विहिरीत आढळला दहा फुटी अजगर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा :  येथील शेतातील विहिरीत सुमारे दहा फूट लांबीचा अजगर मिळून आला. त्याला सुरक्षितपणे सोडून देण्यात आले असून, अजगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

शहादा तालुक्यातील मानमोड्या येथील शेतकरी कैलास भिल यांच्या बागायती शेतातील विहिरीत अजगर मिळून आल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाला कळविले. वनक्षेत्रपाल आशुतोष मेहढे यांनी घटनास्थळी भेट देत सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्र स्वप्नील इंगळे, तन्मय बैसाणे, गोकुळ ईशी यांनी सलग दोन तासांच्या प्रयत्नानंतर दहा फुटी अजगराला सुरक्षित बाहेर काढले व सातपुडाच्या जंगलात सुरक्षितपणे सोडले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news