Hupari Silver Looted : हुपरीत तब्बल पाच लाखांची चांदी लुटली - पुढारी

Hupari Silver Looted : हुपरीत तब्बल पाच लाखांची चांदी लुटली

हुपरी ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात चोरीच्या प्रमाणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल (दि.२७) हुपरीतील एका युवकाला तब्बल पाच लाखाला लुटण्यात आल्याचे समोर आले आहे. हुपरी जवळ असणाऱ्या रेदाळ येथील बिरोबाच्या माळावर या युवकाला लुटल्याचे समोर आले आहे. त्याच्याजवळ असणारी पाच लाख रुपयांच्या किंमतीची चांदी लंपास करण्यात आली आहे. (Hupari Silver Looted)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धूमस्टाईलने दोन मोटार सायकली घेऊन तीन युवकांनी मोपेडवरून चांदी घेवून जाणाऱ्या युवकाला चोरट्यांनी धडक दिली. यानंतर त्याला बोलण्याच्या नादात त्याच्या मोपेडला अडकवलेली चांदी लंपास केल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
याबाबतची माहिती अशी की येथील चांदी उद्योजक निरंजन शेटे यांच्या चांदी कारखान्यात श्रीधर सदाशिव मोरे (वय ४५) हा कामास आहे.

गुरुवार (दि. २७) रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बिरदेव मंदीराच्या पाठीमागे असलेल्या माळरानावरील रस्त्यावरून श्रीधर मोरे हा कच्च्या चांदीमालाच्या पिशव्या घेवून मोपेडवरून येत होते. दरम्यान समोरून दोन मोटर सायकल आल्या व त्याला धडक देत त्याचा माल पळवला यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Hupari Silver Looted : नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

चांदीचा माल घेऊन चाललेल्या एका युवकाला लुटून त्यांच्याकडील पाच लाख रुपयाची चांदी लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. पोलिस दोन मोटारसायकलीवरून आलेल्या तिघांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. तपास सपोनि पंकज गिरी करत आहेत. अशा झालेल्या चोरीने परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. माहीतगार असणाऱ्याकडून ही चोरीची घटना घडली असल्याचा कयास बोलले जात आहे.

Back to top button