MS Swaminathan Death
MS Swaminathan Death

MS Swaminathan Death : डॉ. स्वामीनाथन यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल; पंतप्रधान माेदी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्‍या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचे आज (दि.२८) सकाळी निधन झाले. ते ९८ वर्षाचे होते. चेन्नईच्या रुग्णालयात सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून पाेस्‍ट शेअर केली आहे. पीएम मोदी यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्यासोबतचे फोटो देखील शेअर करत, त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (MS Swaminathan Death)

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदी यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनानंतर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "डॉ. स्वामीनाथन यांचे क्रांतिकारी योगदान हे कृषी क्षेत्राच्या पलीकडे आहे. डॉ. स्वामीनाथन हे नाविन्यपूर्ण शक्तीचे केंद्र होते. त्यांनी अनेकांचे वैचारिक पालनपोषण करणारे मार्गदर्शक होते. त्यांनी संशोधन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून अतूट बांधिलकी निर्माण करत, असंख्य शास्त्रज्ञांवर आपली छाप टाकली आहे." (MS Swaminathan Death)

डॉ. स्वामीनाथन यांच्याशी माझा आत्तापर्यंत झालेला संवाद ह्रदयात जतन करून ठेवण्यासारखी आहे. भारताची प्रगती पाहण्याची त्यांची तळमळ अनुकरणीय होती. त्यांचे जीवन आणि कार्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल, त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना संवेदना, ओम शांती, असे म्हणत पीएम मोदी यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (MS Swaminathan Death)

भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस स्वामीनाथन यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत नाजूक काळात, त्यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यामुळे लाखो लोकांचे जीवन बदलले आणि आपल्या देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली, याचाही उल्लेख देखील पंतप्रधान मोदी यांनी 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news