M. S. Swaminathan : भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन | पुढारी

M. S. Swaminathan : भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी चेन्नई येथे आज सकाळी ११.१५ वाजता निधन झाले. चेन्नईतील तेनमपेट येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला .स्वामीनाथन यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन असा परिवार आहे. अधिकचं उत्पादन देणाऱ्या धानाच्या जाती विकसित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. स्वामीनाथन हे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक होते.

Back to top button