नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या दिल्लीतील घरावर हल्ला करण्यात आला. मंगळवारी हल्लेखोरांनी तोडफोड केली. या घटनेची हिंदू सेनेने या घटनेची जबाबदारी घेतली असून निवेदनही प्रसिद्ध केले आहे.
ओवैसींच्या हिंदूविरोधी वक्तव्यांमुळे संतप्त झालेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी ओवैसीच्या घराबाहेर निदर्शने केली .
यादरम्यान तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हा हल्ला झाला. अशोक रोडवर ओवैसी यांचे शासकीय ३४ क्रमांकाचे निवासस्थान आहे.
काहीजण मंगळवारी तेथे पोहोचले आणि त्यांनी ओवैसींविरोधात घोषणा दिल्या त्यानंतर तोडफोड सुरू केली.
त्यांनी गेटवरील नेम प्लेट्स आणि दिवे तोडले. घराच्या खिडक्यांचेही नुकसान केले.
या घटनेवेळी ओवैसी हे निवासस्थानी नव्हते. या घटनेची ही माहिती संसद मार्ग पोलिस ठाण्याला मिळताच त्यांनी हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ओवैसी आणि त्यांचे भाऊ हिंदू आणि हिंदू देव – देवतांविरुद्ध सतत वक्तव्य करत असतात.
त्यांनी सभांमध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी प्रक्षोभक आणि हिंदूविरोधी वक्तव्य करू नयेत,
असा इशारा हिंदू सेनेचे प्रदेशाध्यक्ष ललित कुमार यांनी व्हिडिओद्वारे केला आहे.
काही गुंडांनी आज माझ्या दिल्लीतील निवासस्थावर हल्ला केला. असे भ्याड हल्ले ते करतच असतात. कारण ते कायम झुंडीने फिरतात.
मी घरी नसताना हा हल्ला झाला. गुडांच्या हातात कुऱ्हाडी आणि लाठ्याकाठ्या होत्या. गुडांनी नेम प्लेट तोडली.
४० वर्षांपासून काम करणाऱ्या राजूला मारहाण केली. धार्मिक घोषणा दिल्या गेल्या. जवळपास १३ जणांनी हल्ला केला.
ओवैसींच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
ओवैसी यांच्या घरावर तिसऱ्यांदा हल्ला केला गेला आहे. यापूर्वी हल्ला झाला त्यावेळी राजनाथ सिंह हे शेजारी राहत होते.
त्यांच्या शेजारी निवडणूक आयोगराचे कार्यालय आहे. पंतप्रधानांचं निवासस्थान केवळ आठ मिनिटांच्या अंतरावर आहे.
हेही वाचा :