Monica Dogra : मोनिकाचा धक्कादायक खुलासा, तेव्हा कळालं मी पॅनसेक्‍सुअल…

monica dogra
monica dogra

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रॉक ऑन' फेम अभिनेत्री आणि गायिका मोनिका डोगराने (Monica Dogra) धक्कादायक खुलासा केला आहे. लैंगिक विषयावर ती नेहमीच बोलत आलीय. अमेरिकेत जन्मलेल्या मोनिकाने आता एका मुलाखतीत मोठे खुलासे केले आहेत. तिने आपण पॅनसेक्सुअल असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही गोष्ट ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय. इतकंच नाही तर मोनिका डोग्राने या संवादात तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असे काही खुलासे केले आहेत. (Monica Dogra)

तिने सांगितले की, कशाप्रकारे तिच्या लहानपणी तिच्या चुलत भावांनी तिचा अनेकदा विनयभंग केला. एवढेच नाही तर एका मित्राने तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला होता मोनिका म्हणते की, ती घाबरलेल्या विचित्र मुलीसारखी मोठी झालीय. यादरम्यान मोनिकानेही पहिल्यांदा तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितले.

चुलत भावांनी लहानपणी विनयभंग केला

२००८ मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मोनिका डोग्राने किरण रावच्या 'धोबी घाट' चित्रपटातही काम केले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, 'तुम्ही कोण आहात हे देखील तुम्हाला माहीत नसेल तर स्वतःवर प्रेम करणे कठीण आहे. मोनिकाने Sexuality विषयी २०१६ मध्ये LGBTQ साठी क्राउडफंडिंग मोहीम चालवली होती. आता मोनिकाने तिच्या बालपणीच्या विनयभंगाबद्दल सांगितले आहे.

पॅनिक ॲटॅक यायचे

इम्रान खानच्या 'ब्रेक के बाद' या चित्रपटातील 'दूरियां' गाण्याला आवाज देणाऱ्या मोनिकाचे कुटुंब मूळचे जम्मूचे आहे. डोगरा स्थलांतरित आहे. मोनिका म्हणते, 'इंटरनेट एक विचित्र गोष्ट आहे. मी माझ्या आयुष्यात खूप डिप्रेशनमध्ये होते. पॅनिक ॲटॅकमुळे मी जवळपास एक वर्ष घर सोडू शकले नाही. त्यानंतर, मला असे वाटते की मी समाज आणि समुदायाचा पाठिंबा मिळण्याची आशा गमावली आहे."

मोनिका आता लॉस एंजेलिसमध्ये राहते. ती म्हणते, 'मी फक्त पाच-सहा वर्षांपूर्वी पॅनसेक्सुअल हा शब्द ऐकला आणि मला वाटले 'अरे देवा! ही तर मी आहे!' ते खूप विचित्र होते. तुम्ही एकतर समलिंगी असू शकता किंवा तुम्ही स्ट्रेट असू शकता. मी पॅनसेक्सुअल होते.

ती पुढे म्हणाली, 'मी लहान असताना काही काळ टॉम बॉयसारखी होते. तर काही दिवस मी पूर्णपणे मुलीसारखी असते. मला माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू दाखवायला आवडत होत्या. मी त्या मुलींना भेटले ज्या मुलांसारखे कपडे घालायच्या. त्या मुलांना भेटले, ज्यांना मुलींप्रमाणे मेकअप करायला आवडायचं. मी ४-५ वर्षांची होते, तेव्हा मला आठवते की, माझ्या शेजारची एक चांगला मैत्रीण मुलांसारखं टॉपलेस होऊन रस्त्यावर फिरत होती. मला वाटले ती किती कुल आहे. होय, तेव्हा मी फारसा विचार केला नाही; पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा त्या गोष्टींनी मला कसे काय  आकर्षित केले याचे आश्चर्य वाटते.

'मला त्या दिवशी पार्टीत मद्यधुंद वाटले'

मोनिका पुढे म्हणते, 'मी एका पार्टीत पूर्णपणे नशेत होते. त्या दिवशी मला समजले की मी एका मुलाप्रमाणे जगणाऱ्या मुलीच्या प्रेमात आहे. याने माझे मन हादरले. तोपर्यंत मी स्वतःला लैंगिकदृष्ट्या सरळ समजत होते. पण त्या दिवशी अचानक मला स्वतःलाच ओळखत नसल्यासारखं वाटलं. त्या दिवशी मी काहीतरी केले आणि मला आनंद झाला. मग मला वाटले की मी उभयलिंगी आहे. तेव्हा मला माहितही नव्हते की मी पॅनसेक्सुअल आहे. पण मला हे पक्के माहीत होते की, मला मुलासारखं जगणारी मुलगी आणि मुलीसारखं जगणारी मुलगा दोन्ही आवडतात. साधारण ६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की, आता मला अनेक प्रकारचे लोक भेटले आहेत आणि स्वतःला पॅनसेक्सुअल म्हणणे योग्य वाटते. माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत जे शोधत होते ते खूप सुंदर आहे.'

मित्राने चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना मोनिका म्हणाली, 'मी एका वेगळ्या कुटुंबातून आलेली आहे. माझी आई आणि मी आमच्या आयुष्यातील ११ वर्षांहून अधिक काळ वेगळे राहिलो. माझे वडील बहुतेक गप्प असतात, मी मनापासून शेअर केले तरी ते ऐकत नाहीत. मला वाटते त्यांच्या कुटुंबात असे बरेच लोक असू शकतात. माझ्याच घरात माझे चुलत भाऊ माझा विनयभंग करायचे. माझ्या मित्राने मी झोपेत असताना मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. माझ्या कलेतून मी माझे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पती चांगला मिळाला पण लग्न टिकलं नाही

मोनिकानेही पहिल्यांदा तिच्या लग्नाबद्दल बोलले. ती म्हणते, 'माझं एका पुरुषाशी लग्न झालं. एक माणूस जो खूप हुशार होता. मी ज्या चित्रपटात काम केले त्या चित्रपटातील माझ्या सहकलाकारांचे मला आकर्षण होते हे मला त्याला सांगायचे होते. त्याने मला समजून घेतले. यामुळे मी आणखी त्याच्या प्रेमात पडले. पण, त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या मार्गावर होतो. आम्ही आमचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला. मी माझे लग्न मीडिया आणि जगापासून नेहमीच गुप्त ठेवले आहे.

मोनिका डोगराचे नाव एकेकाळी हर्षवर्धन कपूरसोबतही जोडले गेले होते. मोनिकाला विचारण्यात आले की, ती कोणाच्या प्रेमात आहे का, तर ती म्हणते, 'मी माझ्या लव्ह लाईफबद्दल कधीच बोलले नाही. ते कोणाच्या लक्षात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. होय, मी नक्कीच म्हणेन की मी आयुष्यात प्रेम शोधण्यात खूप गुंतले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news